प्रकाश आंबेडकर, सोलापूर व अकोला मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविणार !

साताऱ्याच्या सभेत प्रवक्ते लक्ष्मण माने यांची घोषणा...

428

सातारा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीत अकोला आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढतील अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी येथे जाहीर सभेत केली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साताऱ्यात विराट सभा पार पडली. प्रकाश आंबेडकर हे अकोल्याचीही जागा कायम ठेवत सोलापूर मधून लढणार आहेत, बाळासाहेबांनी दोन्ही मतदार संघात प्रचाराला येऊ नये आम्ही जीवाचे रान करीत त्यांना पहिल्या क्रमांकाने निवडून आणू असा ठाम विश्वास यावेळी लक्ष्मण माने यांनी दिला.

आंबेडकर सोलापूर मधून लढणार असल्याची माने यांनी घोषणा करताच लाखो लोकांनी अर्धा तास टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या या घोषणेला पाठिंबा दिला.