भीषण अपघात : सातारा – पंढरपूर राज्य महामार्गावर अपघात, दोन ठार, चार जखमी…

253

साताऱ्याहून पंढरपूरकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील विखळे येथील मायणीजवळ मोटार आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. त्यामध्ये दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले. सातारा-पंढरपूर राज्य महामार्गावर पंढरपूरकडे जाताना दुपारी चारच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

सूरज राजाराम माळी (वय २७, रा. मायणी मानमोडी ता. खटाव) आणि संतोष किसनराव बिराजदार (४०, रा. सय्यदपूर, ता. देवणी, जि. लातूर) अशी मृतांची नावे आहेत.

राजकुमार बिराजदार, ज्योतिराम धनाजी बिराजदार, दत्ता बिराजदार, महेश विठ्ठल झोळकुडे हे तरुण गंभीर जखमी झाले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.