धनंजय मुंडेनी केली आश्वासनची पूर्तता; ‘नसोसवायएफ’ च्या प्रयत्नाला यश; एम.फिल.पि.एचडी ला बार्टीची फेलोशिप…

552

नांदेड; दि.२८ – नँशनल एससी/एसटी/ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट (नसोसवायएफ) च्या विद्यार्थी नेत्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन निवेदन देत डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र(बार्टी) तर्फे अनुसुचित जाती प्रवर्गातील एम.फिल/पि.एचडि च्या प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांंना फेलोशिप साठी अर्ज मागवण्यात यावे ह्यासाठी चर्चा केली.

संशोधक विद्यार्थी नेत्यांनी संशोधक फेलोशिप ची मागणी मान्य करावी व लवकरात लवकर जाहिरात काढावी अशी मागणी केली असता तात्काळ जाहिरात काढू असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी चर्चे अंती दिले होते. तेच अश्वासन त्यांनी ४८ तासाच्या आत खरे करून मान्यत: दिली असून २०१९ व २०२० च्या एम.फिल./पि.एचडी. प्रवेशित विद्यार्थ्यांंसाठी डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र(बार्टी) ची जाहिरात काढली आहे.

राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित संवर्धनासाठी तसेच संशोधनास संशोधनकर्त्यास वाव मिळवा यासाठी राज्य सरकारने डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र(बार्टी) ची फेलोशिप सुरु केली होती. परंतु कोरीना कोविड-19 मुळे बार्टी फेलोशिपची जाहिरात काढण्यात आली नव्हती. ना. मुंडे यांच्या सोबत नसोसवायएफ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली तसेच सामाजिक न्यायमंत्र्यांनी ते गांभीर्याने घेऊन २४ तासाच्या आत फेलोशिपची जाहिरात काढून अर्ज मागविले आहेत. त्यामुळे नँशनल एससी/एसटी/ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट (नसोसवायएफ) च्या निवेदनाला यश आले आहे. या चर्चेत सहभागी संघटन पदाधिकारी प्रा. सतिश वागरे, स्वप्निल नरबाग, संदिप जोंधळे, मनोहर सोनकांबळे, प्रविण सावंत, अनुपम सोनाळे हे होते तसेच सर्व नसोसवायएफ च्या कार्यकर्त्यांचे चे हे यश आहे.