ड्रीम्स मॉल आग : मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत…

270

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या भीषणआगीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात येईल. मेलेले बहुतेक रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. मी संताप व्यक्त करतो आणि पीडित कुटुंबांकडून दिलगिरी व्यक्त करतो अशी संवेदना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. राज्यातील मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये जिथं कुठं कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत, तेथील अग्निसुरक्षेची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले आहेत.

करोना संकटामुळे मॉलला तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालय सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालयाच्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, “काल रात्री आपण कोविडसाठी काही ठिकाणी तात्काळ आणि तात्पुरत्या पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयाची परवानगी दिली होती. त्यातलंच एक हे मॉलमध्ये तयार केलेलं रुग्णालय होतं. आपण राज्यभर जिथे शक्य असेल तिथे आवश्यकतेनुसार कोविड सेंटर आणि रुग्णालयांसाठी परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे हे रुग्णालय सुरु होतं. ही तात्पुरती परवानगी होती आणि ३१ तारखेला संपत होती”.