औरंगाबाद विमानतळाचं नामकरण ‘छत्रपती संभाजीराजे विमानतळ औरंगाबाद’ असं होणार , मंत्रिमंडळाचा निर्णय…

390

मुंबई : महविकास आघाडी सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. औरंगबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचं नाव हे बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं झालं आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.