#LOKSABHA2019 पीएम मोदी-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर, आमचा संकल्प पत्र सामान्य नागरिकांसाठी -मोदी

676

लातूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला संबोधित करताना पीएम मोदींनी काँग्रेसच्या घोषणा पाकिस्तानच्या समर्थनात असल्याचे आरोप केले. या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसून आले. या ठिकाणी 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

काँग्रेस पक्षावर टीका करत असताना पंतप्रधानांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “काँग्रेस जम्मू आणि काश्मीरमध्ये वेगळ्या पंतप्रधानाची मागणी करत आहे. शरद पवार साहेब तुम्ही अशा लोकांसोबत आहात. या देशाला काँग्रेसकडून काहीच अपेक्षा नाहीत. परंतु, शरद साहेब तुम्हाला हे शोभत नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना म्हणाले, “मतदारांची तपश्चर्या व्यर्थ जाणार नाही. विकास करून आपल्या व्याजाची परतफेड करणार आहे. आम्ही विकासात प्रत्येक भारतीयाचा सहभाग करू इच्छितो. एकीकडे आमची धोरणे आहेत आणि दुसरीकडे आमच्या विरोधकांच्या दुटप्पी भूमिका आहेत.”

पंतप्रधान पुढे म्हणाले, “दहशतवादी अड्ड्यांमध्ये घुसून मारू हे नवीन भारताचे धोरण आहे. दहशतवादाला पराभूत करणारच असा आमचा संकल्प आहे. सीमेवरील घुसखोरी, आणि नक्षलवाद रोखून आदिवासींचा विकास साधण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत घेत राहणार आहोत.”

मोदींनी काँग्रेसचा जाहीरनामा हा पोकळ दावे असलेला ढकोसलापत्र आहे असे म्हटले आहे. त्यांचे ढकोसलापत्र नामदार घराण्याची चौथी पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. तर आमचा संकल्प पत्र सामान्य जनतेला सुरक्षित करण्यासाठी आहे. असेही मोदी म्हणाले आहेत.