‘वंचितांचा’ लाखोंचा जनसमुदाय; प्रकाश आंबेडकर भरत आहेत ‘अकोल्यातून’ उमेदवारी अर्ज…

989

अकोला: काल सोलापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आज अकोला लोकसभा मतदार संघातूनही अर्ज दाखल करत आहेत. सोलापुरात तब्बल ५ लाखाचा जनसमुदाय काल उपस्थित होता. त्याचीच पुनरावृत्ती आज अकोला येथे देखील झाली आहे. प्रकाश आंबेडकर करत असलेल्या ह्या जोरदार शक्तिप्रदशनामुळे प्रस्थापित पक्षाच्या व त्यांच्या उमेदवारांच्या उरात धडकी भरत आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावत आहे. जनतेच्या ह्या अमाप लोकसंख्येचे मतात रूपांतर करण्याचे आव्हान प्रकाश आंबेडकर यांच्या समोर आहे.