प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणुकीच्या रिंगणात ..

668

अकोला: वंचित बहुजन आघाडी व भारिप चे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा पारंपारिक अकोला लोकसभा मतदारसंघ सोडून सोलापूरातून लोकसभा निवडणुक लढवण्याची घोषणा आज केली. त्यांच्या ह्या घोषणेने काँग्रेसचे नेते आणि सोलापूरचे संभाव्य उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर कांग्रेस आघाडीसोबत जाण्याची शक्यता आता कमी झाली आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची घोषणा आज केली आहे. प्रकाश आंबेडकर हे आता वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार असतील. त्यांनी ही घोषणा आज अकोल्यात पत्रकारांशी बोलताना केली आहे.