… अन्यथा माझा निर्णय ३१ जानेवारीला : प्रकाश आंबेडकर

601

…अन्यथा माझा निर्णय ३१ जानेवारीला: प्रकाश आंबेडकर.

अकोला : काँग्रेसनं त्यांचा निर्णय ३० जानेवारीपर्यंत जाहीर करावा, अन्यथा मी माझा निर्णय ३१ जानेवारीला जाहीर करेल, असा अल्टिमेटम भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला आहे.

नांदेडच्या सभेत एमआयएमने, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसनं योग्य सन्मान राखला तर आम्ही निवडणुक लढवणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तरीही अजूनही काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.

काँग्रेस एमआयएम या मुद्द्यापलीकडे जात नाही असा आरोप त्यांनी कॉंग्रेस वर केला.

जुलैमध्ये काँग्रेसला १२ जागांचा प्रस्ताव दिला. मात्र, त्यावर अद्यापपर्यंत काँग्रेसकडून कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.