… तरच काँग्रेससोबत आघाडी : प्रकाश आंबेडकरांची स्पष्ट भूमिका

745

अमरावती : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडीच्या अनुषंगाने बोलणी सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडी तर्फे १२ जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. आम्हाला १२ जागा मिळाल्या तरच काँग्रेस सोबत आघाडी करणार अशी स्पष्ट भूमिका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अमरावतीत मधील आयाेजित जाहीर सभेत दिली.

सर्वच वंचित समाजाला १२ जागांमध्ये स्थान मिळणार असेल तरच काँग्रेससोबत आघाडी करू, असा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवाय ज्या मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नाही, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात काही ठराविक कुटूंबाचीच सत्ता आहे. आणि हि मक्तेदारी मोडल्याशिवाय सर्वसामान्य समाजाची सत्ता येणार नाही. वंचित समाजाला सोबत घेतल्याशिवाय राज्यात कुणालाही यापुढे सत्ता संपादन करता येणार नाही, हे काँग्रेसला चांगले माहिती आहे. त्यामुुळेच काँग्रेसला आंबेडकर सोबत हवेत, परंतु एमआयएम नको आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रस्तावानंतर खासदार ओवेसी यांनी देखील मोठेपणा घेत, प्रकाश आंबेडकरांना सन्मानपूर्वक जागा द्यावेत, एमआयएम ला काही नको अशी भूमिका घेतली आहे. मात्र, शेवटपर्यंत झुलवत ठेवायची काँग्रेसची सवय आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार असलो तरी त्यांच्यासमोर १२ जागांचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.