कॉंग्रेस हा बदमाशांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

1214

अमरावती : काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात अजून तरी दुरावा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे बहुजन वंचित आघाडीशी संपर्क साधून आहेत. काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष असून आता आघाडी होईल अशी वाट पाहण्यात अर्थ नाही अशा कठोर शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. आज ते अमरावती येथे पत्रकारांना संबोधित करत होते. काँग्रेसनं १२ जागा सोडल्यास काँग्रेसशी आघाडी करू असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. आज अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे..