काँग्रेसचा मुंबईतला पहिला उमेदवार घोषित; वर्षा गायकवाड यांना उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी..

32

Mumbai : लोकसभा निवडणुक २०२४ साठी काँग्रेसने मुंबईतला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीमध्ये मुंबईतल्या एकूण सहा जागांपैकी चार जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मिळाल्या, तर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावं लागलं. यातली उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.

उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढणाऱ्या वर्षा गायकवाड या मुंबई दक्षिण मध्य मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या, पण शिवसेना ठाकरे पक्षाकडून ही जागा सोडली गेली नाही. उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातून अनिल देसाई यांना रिंगणात उतरवलं आहे. मुंबई दक्षिण मध्यची जागा न मिळाल्यामुळे वर्षा गायकवाड नाराज झाल्याची चर्चाही रंगली होती. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात अनिल देसाई विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यात लढत होणार आहे.

https://x.com/YuvaPrabhav?t=klAN_6m6i4RoD9MwjbFOzw&s=09