Maharashtra : तीन राज्य माहिती आयुक्त नियुक्त; अधिसूचना जारी…

242

मुंबई । राज्य शासनाने अखेर तीन राज्य माहिती आयुक्त नियुक्त केले आहेत. गुरुवारी त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय आणि राहुल भालचद्र पांडे अशी नव्याने नियुक्त केलेल्या माहिती आयुक्तांची नावे आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना केल्या होत्या, त्या अनुषंगाने राज्य सरकारने माहिती अधिकारी नियुक्त केले आहेत.

२०१८ मध्ये माहिती आयुक्तांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने माहिती आयुक्तांची पदे भरली नव्हती. परिणामी प्रलंबित अपिलांची संख्या २० पर्यंत गेली होती. त्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.