यंदा दहावी बारावीचा निकाल मे महिन्यातच लागणार, निकालाची तारीख जाणून घ्या..

69

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी बोर्डाची परीक्षा 1 ते 26 मार्च 2024 आणि बारावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीमध्ये घेतली होती.

बोर्ड परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार हा सवाल पालकांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल केव्हा लागू शकतो याबाबत माहिती दिली आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा दहावी तसेच बारावीचा निकाल हा लवकर लागण्याची शक्यता आहे. यावर्षी दोन्ही वर्गांचे निकाल मे महिन्यातच जाहीर अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर राज्य मंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात आणि 10 वी चा निकाल चौथ्या आठवड्यात जाहीर करण्याचा राज्य मंडळाचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. त्यांनी कोणत्या तारखेला निकाल लागणार हे तर सांगितले नाही मात्र मे महिन्यातच दोन्ही वर्गांचे निकाल लागतील हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे मे महिन्यातच दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर व्हावेत यासाठी राज्य मंडळाकडून दैनंदिन फॉलोअप सुरू असून, निकालाचे काम जलदगतीने करण्यासाठीच्या आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी माध्यमांना दिलेली आहे.

पुढील महिन्यात निकाल जाहीर होणार हे जवळपास आता फिक्स झालेले आहे यामुळे आता आपण दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल कसे पाहायचे हे देखील जाणून घेणार आहोत.