सांगलीची प्रतिक्षा बागडी जिंकली; ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी…

188

Sangli : सांगली येथे महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी (Women Maharashtra Kesari) स्पर्धा पार पडली.  महाराष्ट्रात प्रथमच अशी महिलांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हिने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे.

प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या दोघींमध्ये अंतिम लढत झाली. सांगलीच्या तुंग गावची असलेली प्रतीक्षा बागडी ही 21 वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथे सराव करते. दिनांक 23 व 24 मार्च रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी राज्यभरातून 45 संघांतून सुमारे 400 ते 450 स्पर्धक सहभागी झाले होते.