शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिव्या; मुंबई हायकोर्टात सदावर्तेंनी केली जरांगेच्या आंदोलनाची पोलखोल…

66

Mumbai : अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना सलाईन लावण्यात आले. याच दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली.

या सुनावणीवेळी काय झालं याची माहिती सदावर्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांनी वापरलेल्या शिवराळ भाषेवरून जोरदार टीका केली.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यातील जनतेला वेठीस धरलं जात आहे. जरांगेंची भाषा न्यायालयाला दाखवली. जरांगे यांची मागणी असू शकते पण त्यांचं आंदोलन कसं सुरू आहे त्याचा व्हिडीओ दाखवला. आवाज वाढवून दाखवला असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.

जरांगेंनी शिवीगाळ केली त्यावर सदावर्ते म्हणाले की, जरांगेंनी जी शिवराळ भाषा वापरली ती कोणती गिरी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून शिवीगाळ करणे हा कोणता मोठेपणा आहे. त्यात सरकारला तुझ्या मायचा असं बोलले. व्यक्तीगत बोलण्यात आले. मागासवर्गीय मंत्र्यांना, मलाही बोलले. तिरळ्या-बांग्या बोलले.

जरांगेंच्या आंदोलनाची पद्धत न्यायालयाला सांगितली. जरांगेंच्या वकिलांना कॉपी मिळाली. जरांगे उपोषण थाबंवणार आहेत की नाहीत, उपचार घेणार आहेत की नाहीत ते न्यायालयाने विचारलंय. आंदोलन हे राज्याला वेठीस धरण्यासाठी, दुसऱ्यांवर अत्याचार करण्यासाठी नसतं. जरांगे सलाईन घेत असतील तर ते उपोषण संपलं, जर उपोषण संपलंय तर ते कोणत्या प्रकारचं ते मला माहिती नाही. मग याला आंदोलन म्हणायचं की आंदोलनाचा दिखावा, की वेठीस धरण्यासाठी असा प्रश्न सदावर्तेंनी विचारला.

न्यायालयाने या प्रकरणावर उद्या अडीच वाजता सुानवणी ठेवलीय. संबंधित बाबींवर चर्चा होऊ शकते असं न्यायालयाने सांगितलंय. राज्यासाठी किती नुकसानकारक आहे ते न्यायालयानेही सांगितलंय. जरांगेंची शिवराळ भाषा, आंदोलनाची पवित्रता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अशी भाषा हे सगळं पाहता उद्या ते आटोपून घेतील. सलाईन घेतलं म्हणजे उपोषण संपलं असं सदावर्ते म्हणाले.

मराठा आमचे भाऊ मागासच नाहीत, त्यामुळे कायद्याला डंके की चोट पर विरोध आहे. जरांगेंनी खारीक खाव्या, दूध प्यावं. माय बहिणीवर शिव्या देऊ नये. जरांगेंनी, सदृढ रहावं, उपद्व्याप करू नये. सामान्यांचा, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विचार करावा. जरांगेंची भूमिका काय हे सांगावं असं न्यायालयाने स्पष्ट विचारलंय असंही सदावर्ते म्हणाले.

जरांगेचे वकील म्हणाले की, जरांगेना न्यायालयाने बजावलेली नोटीस ही २५ जानेवारीला आंदोलनाची दिशा होती, मुंबईकडे येत असताना याचिका दाखल केल्या होत्या. त्या याचिकेसंदर्भात उत्तर देण्यासाठी जरांगेंना नोटीस बजावली होती. दोन्ही याचिकांची सुनावणी एकत्रित झाली, त्याची प्रत नसल्याने ती मिळावी अशी विनंती केली.

अंतरवालीत जे आंदोलन सुरू आहे त्यात जरांगेंच्या तब्येतीची काळजी आहे. त्यासंदर्भात न्यायालयात चर्चा झाली. औषध उपचार घेण्यासंदर्भात काय तुमचा विचार आहे? असं कोर्टाने विचारलंय. उपोषणाचा सहावा दिवस आहे, ते शुद्धीवर नव्हते, त्यांना सलाईन देण्यात आले. ज्यासाठी व्यक्तीने आंदोलन सुरू केलंय, ते मराठा वर्गाला न्याय देण्यासाठी आंदोलन आहे. अत्यंत शांततेनं आंदोलन सुरू आहे. अंतरवालीतून ते आले तेव्हा शांततेत वाशीपर्यंत आले. आजही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत असंही जरांगेच्या वकिलांनी सांगितलं.