श्री खडीचा म्हसोबा मंदिर परिसरातील एखादा खडा उचलला तरी कायदेशीर कारवाई करणार…

602

माझ्या कडे वाणी समाजाचा, आपल्याच गावाचा एक होतकरू मुलगा, दादा वाणी हा भक्त आला आणि म्हसोबा देव माझ्या स्वप्नात आला असून माझी सेवा कर असा दृष्टांत दिला आहे असं मला सांगितले. त्यावर मी रंगा वाणी ला ही हकीकत सांगितली आणि दोन दोन रविवार वाटून पूजा अर्चा करा असे सांगितले. या घटनेवर हा सर्व आकांड तांडव उभा करण्यात आला आहे.

आता तुम्ही मंडळींनी सांगा. मी देवाला आलेल्या देणग्या चा हिशोब मागितला?. देवाच्या वर्गणीचा, भक्तांनी अर्पण केलेल्या दान, सोने, चांदीचा हिशोब मागितला,? पालखीच्या वर्गणीच्या हिशोब मागितला? की दरवर्षी कर्नाटक प्रांतातील भक्त ज्या भरघोस देणग्या देतात त्याचा हिशोब मागितला.? मग पुजाऱ्याला दोन दोन आठवडे वाटून पूजा अर्चा करा असे सांगितले. तर रंगा पुजारी आणि पंच कमिटीला एवढा आकांडतांडव करण्याची गरज काय?

कुणी म्हणतय म्हसोबा मंदिर ताब्यात घेतले, यावर जे म्हसोबा मंदिर माझ्या पूर्वजांनी वसवले, जे माझ्याच ताब्यात आहे. ते मी पुन्हा कशाला ताब्यात घेवू.?

मागील रविवारी रंगा वाणी आणि पंच कमिटी यांनी एक कौल लावतानाच व्हिडिओ बनवला. आपण सर्वांनी तो बघितला असेलच. दुसरे प्रति म्हसोबा मंदिर बांधणार. असा एक मत प्रवाह बनवला जात आहे. २०२३ च्या जत्रे पासून पंच कमिटी मधील काही महाभाग लोकांचे स्वप्न आहे. त्यातील काहींचा तर घरादाराचा विस्कोट झाला. मात्र तरीही अजून शहाणे होत नाहीयेत. असो विनाशकाले विपरीत बुद्धी.

खुशाल दुसरे मंदिर बनवा. मात्र खबरदार जर कुणी खडीचा म्हसोबा देवाला हात लावाल, मंदिर परिसरातील एक खडा जरी उचलला तर, देव म्हसोबा, संबधितला जी शिक्षा देईल ती देईल मात्र उचलणाऱ्यासह, पंच कमिटी वर कठोर कायदेशीर कारवाई करणार. असा इशारा मी या ठिकाणी देत आहे. पंच कमिटीत स्वतः सरपंच विद्यार्थी आहे, महिला देखील आहेत. सुज्ञ व्यक्तीस जास्त सांगावे लागत नाही. 

आपला

गोरख (बापू) बाळू कांबळे

संस्थापक /अध्यक्ष

श्री खडीचा म्हसोबा मंदिर संस्थान. (नियो)

अलकुड (एस), तालुका: कवठे महांकाळ