बसपा प्रमुख मायावती “इंडिया” आघाडीत सामील होणार? प्रियांका गांधीची मायावतींची घेतली भेट. 

122

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यासुद्धा विरोधकांच्या इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, काही दिवसापूर्वीच कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांची भेट घेतल्याचे आज समोर आले असून, या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उघडली आहे. या आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. असे जरी असले तरी अद्यापही देशातील काही पक्ष तटस्थ असून, ते ना एनडीएचा भाग आहेत ना इंडियाचा. त्यामधीलच एक पक्ष म्हणजे मायावतींचा बसपा. या पक्षाने आपण कोणत्याही गटात जाणार नसून, तटस्थ राहणार असल्याची घोषणा केली होती. यादरम्यान मात्र प्रियांका गांधी आणि मायावती यांच्या भेटीमुळे बसपा इंडिया आघाडीत सहभागी होण्याची चर्चा होत आहे

.