#NamasteTrump : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोऱ्यासाठी 25 हजार पोलिस तैनात; 36 तासांच्या दौऱ्यात सुरक्षेवर 100 कोटींचा खर्च…

1017
Gujarat, Feb 18 (ANI): Posters of Prime Minister Narendra Modi, US President Donald Trump, and US' First lady Melania Trump put up ahead of Trump's visit to India on 24th February, in Ahmedabad on Tuesday. (ANI Photo)

नवी दिल्ली : जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येत असल्यामुळे, त्यांच्या ह्या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या दौऱ्याची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प, यांच्या सोबत पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर भारतात येत आहेत. हे ट्रम्प कुटुंब प्रत्येक क्षणाला 5 टिअर सुरक्षेत असणार आहे. त्यांना मोटेरा स्टेडियमवरुन परत एअरपोर्ट आणि आग्रा विमानतळावरुन ताजमहलपर्यंत घेऊन जाण्यासाठी विशेष हेलिकॉप्टर मॅरीन वन आणि जगातील सर्वोत्तम सुरक्षा असलेली कार कॅडेलिक (बीस्ट) देखील अहमदाबादमध्ये पोहचली आहे.

ट्रम्प यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी अमेरिकी सीक्रेट सर्विस यांच्यावर असेल आणि यांच्यापर्यंत फक्त भारतीय लायजनिंग अधिकारीच जाऊ शकतील. दुसऱ्या टप्प्यात एनएसजी, चेतक कमांडो, अर्ध सैनिक बल आणि शेवटच्या टप्प्यातील सुरक्षेची जबाबदारी गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांच्या 25 हजार जवान तैनात असतील. ट्रम्प यांच्या सुरक्षेवर अंदाजे 100 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे अमेरिकी लष्कराचे ते सर्वोच्च कमांडरदेखील आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी ते परमाणू बटन असलेले एक ब्रीफकेस (फुटबाल) सोबतच घेऊन फरतात. ब्रीफकेसमध्ये गोल्ड कार्ड (बिस्कीट) असतो, ज्याच्या मदतीने परमाणू अटॅक केला जाऊ शकतो.

YuvaPrabhav सोबत कनेक्टेड राहा.

बातम्या व इतर अपडेट साठी आम्हाला फेसबुक वर लाइक आणि ट्विटर वर फॉलो करा..