Navi Mumbai : वादग्रस्त संभाजी भिडे यांची सभा भीमसैनिकांनी उधळली…

427

नवी मुंबई : नेहमीच बाष्कळ आणि वादग्रस्त विधाने करून दुहीची बीजे रोवणाऱ्या संभाजी भिडे यांची नवी मुंबईत होणारी सभा भीम सैनिकांनी उधळून लावली. भीम सैनिकांनी थेट सभास्थळी मोर्चा काढत जोरदार आंदोलन करून ही सभा उधळून लावली. ह्या भीम सैनिकांचे सर्वच आंबेडकरी समाजाकडून जोरदार अभिनंदन करण्यात येत आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रविवारी सायंकाळी ४ वाजता कोपरखैरणे सेक्टर-५ मधील कै. अण्णासाहेब पाटील स्मृतीभवन सभागृहामध्ये संभाजी भिडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे यांच्या विरोधात बहुजन समाजात प्रचंड मोठा असंतोष आहे. त्यामुळे त्यांचा विरोध करण्यासाठी नवी मुंबईतील सर्व बहुजन पक्ष व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमस्थळी मोर्चा काढला. या वेळी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे, तसेच जातीय तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

संभाजी भिडे हे भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारातील प्रमुख आरोपी असल्यामुळे त्यांच्या जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी करत नवी मुंबईतील सर्व बहुजन पक्ष व संघटनांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय भोसले यांची भेट घेतली होती.

निषेध मोर्चामध्ये रिपब्लिकन पक्षाचे विजय कांबळे, सचिन कटारे, टिळक जाधव, ॲड. स्वप्नील जगताप, वंचित बहुजन आघाडीचे भूषण कासारे, शिल्पा रणदिवे, अश्वजीत जगताप, संतोष जाधव, राजेश भालेराव, दलित पँथरचे सुनील गायकवाड, बसपाचे राजेश जयस्वाल हे प्रमुख पदाधिकारी व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रविवारी दुपारी नवी मुंबईतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन सेना, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, ऑल इंडिया पॅंथर सेना, दलित पॅंथर, आगरी-कोळी एकता महासंघ या सर्व बहुजन पक्ष व संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भिडे यांच्या निषेधार्थ कोपरखैरणेतील नॉर्थ पाँईट शाळा ते कार्यक्रम स्थळापर्यंत मोर्चा काढला. या दरम्यान कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

या सर्व कार्यकर्त्यांवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

www.YuvaPrabhav.Com हे एक स्वतंत्र मराठी वेब न्यूज पोर्टल आहे. आपण दिलेल्या लाईक, शेयर आणि क्लिक वर गुगल कडून प्राप्त झालेल्या निधी वर YuvaPrabhav.Com सुरू आहे. त्यामुळे बातम्या शेयर करा. Google Play Store वरून YuvaPrabhav चे मोबाईल application डाऊनलोड करा. आम्हाला ट्विटर, फेसबुक वर फॉलो करा. WhatsApp News group मध्ये सामील व्हा. ही विनंती. – आपला प्रफुल कांबळे.