अग्रलेख : निळ्या झेंड्याचा उमेदवार नागालँड मध्ये जिंकला; महाराष्ट्रात कधी जिंकणार..?

निळ्या झेंड्याचा आधार घेवून निवडून आलेले चकार शब्द काढायला तयार नाहीत. राखीव जागांवर निवडून आलेले आमदार, खासदार तर सनातनी दलीत अशी नवी उपाधी लावून घेत आहेत. आणि हे त्यांचे भूषणावह आहे. ही शोकांतिका आहे. 

249

( प्रफुल कांबळे) | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे खऱ्या अर्थाने जादुगार आहे. एकही आमदार किंवा खासदार नाही. त्यांचे पक्षाचे ते एकमेव खासदार तरीदेखील केंद्रात मंत्रिपद असणारे एकमेव नेते. खुद्द नरेंद्र मोदी स्वतः त्यांची दखल घेतात. हे ही विशेष आहे. दरम्यान रामदास आठवले यांना आणि त्यांच्या पक्षाला आजवर महाराष्ट्रात जे जमले नाही ते त्यांनी नागालँड मध्ये करून दाखवले आहे. तेथील विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकाच झटक्यात २ आमदार निवडून आणले आहेत. ते देखील स्वबळावर. नागालँड मध्ये राजकीय गणित जुळवत त्यांनी आता सत्तेत भागीदारी मागितली आहे. जी कामगिरी ते आजवर महाराष्ट्रात करु शकले नाहीत. ते रामदास आठवले यांनी नागालँडमध्ये करुन दाखवलं आहे.

मै बजा दुंगा पाकिस्तान का बँड., इसिलिये आया हु मैं नागालँड.” आठवलेंचं हे वाक्य नागालँड निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चर्चेत होतं. इकडे महाराष्ट्रात कसबा-चिंचवडच्या दोन जागांसाठी मविआ आणि भाजपला घाम फुटला होता.  पण तिकडे आठवलेंनी कुणाला भणक ही न लागू देता नागालँडमध्ये दोन आमदार निवडून आणले. त्यामुळे आरपीआय मध्ये सध्या नवचैतन्याचे वातावरण आहे. निळ्या झेंड्याचे दोन आमदार निवडून आल्याने आंबेडकरी समाज देखील रामदास आठवलें चे भरभरून कौतुक करत आहे.

रामदास आठवलेंचा रिपाइंनं अनेक वर्षांपासून नागालँड भागात काम सुरु केलं होतं. भाजपसोबत युतीत लढण्याची त्यांची इच्छा होती. मात्र नागालँडमद्ये भाजपनं युतीस नकार दिला. त्यामुळे आठवलेंनी 8 जागांवर स्वतंत्र उमेदवार दिले. प्रचारात भाजप सरकारचं कौतुक करत जिथं रिपाइंचे उमेदवार नाहीत. तिथं आठवलेंनी भाजपला पाठिंबा दिला होता.

रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे Y लिमा ओनेन चँग (Y. Lima Onen Chang) यांनी नागालँडमधील नोक्सेन जागा ( Noksen seat ) जिंकली आहे. तर इम्तीचोबा ( Imtichoba ) यांनी तुएनसांग सदर-II ( Tuensang Sadar-II seat ) ही जागा जिंकली आहे. अनेक वर्षानंतर निळ्या झेंड्याचा उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे हे यश विशेष आहे.

निळ्या झेंड्याचा उमेदवार नागालँड मध्ये विजयी झाले. मग महाराष्ट्रात हे का घडू शकत नाही.? असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो. निळ्या झेंड्याचा आधार घेवून अनेक जण निवडून येतात. सत्ताधारी बनतात आणि निळ्या झेंड्याला, आंबेडकरी पक्षाला समाजाला विसरतात. हे काही नवीन नाही. कामापुरते बेंबीच्या देठापासून जय भीम च्या घोषणा देणाऱ्यांची संख्या कमी नाही. आजही ठिकठिकाणी दलीत, बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार होत आहे. मात्र तरीही निळ्या झेंड्याचा आधार घेवून निवडून आलेले चकार शब्द काढायला तयार नाहीत. राखीव जागांवर निवडून आलेले आमदार, खासदार तर सनातनी दलीत अशी नवी उपाधी लावून घेत आहेत. आणि हे त्यांचे भूषणावह आहे. ही शोकांतिका आहे.

जोपर्यंत निळ्या झेंड्याचे उमेदवार निवडून येणार नाहीत. तोवर आंबेडकरी समाजाला न्याय मिळणार नाही. हे वास्तव आहे. रामदास आठवले यांनी जो करिश्मा नागालँड मध्ये करून दाखवला तोच करिश्मा इतर राज्यात आणि महाराष्ट्रात देखील करावा. यासाठी त्यांना सदिच्छा… धन्यवाद.

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

Email : kampraful@gmail.com

Mobile : 91-9768000249

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)