Weather Update : राज्यात पाऊस कधी? या तारखेपासून मुसळधार पावासाचा अंदाज..

221

Mumbai : पुढच्या 3 दिवसांमध्ये राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 25 जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता आहे. आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.