वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांची भेट…

366

Nanded : नांदेड जिल्ह्यातील बोंडार येथे जातीयवादातून अक्षय भालेराव ह्या दलित तरुणाचे हत्याकांड घडले आहे. मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांची काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेवून कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अक्षयचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला. आरोपींना पाठीशी घालणार्या कॉंग्रेस पदाधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही कॉंग्रेस पक्षाकडे करणार आहोत. तसेच सोशल मीडियावर अक्षय भालेरावची बदनामी करणारे, संभ्रम निर्माण करणार्या पोस्टकर्त्यांची देखील चौकशी करण्यात यावी.

या घटनेमागील जो मेंदू आहे, त्याचाही शोध घेतला पाहिजे. या हत्येचा कट रचणार्या लोकांचा सीडीआर रेकॅार्ड तपासला जावा अशी मागणी यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

या संदर्भात लवकरच नांदेड एसपी, कलेक्टर यांची भेट घेवून आरोपींना आश्रय देणार्या लोकांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

तसेच राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रैक कोर्टात घ्यावे, कुटूंबीयांना समाजकल्याण खात्याने आर्थिक मदत करावी, तसेच पोलीसांनी चार्जशीटमध्ये सर्व आरोपींचा यातील रोल स्पष्ट करावा व कुटूबीयांना सरकारने त्यांच्या पसंदीचा वकील द्यावा.अशी मागणी यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.