दिलासादायक बातमी : PNG आणि CNG च्या दरात होणार कपात..

253

नवी दिल्ली : देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पीएनजी आणि सीएनजीच्या दरात होणार कपात असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असल्याची माहिती आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

देशांतर्गत गॅसच्या किंमती आयात कच्च्या तेलाच्या किंमतीशी संलग्न केल्या जातील असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाचा बैठकीत झाला आहे.