आरआरआरने ऑस्करमध्ये रचला इतिहास, ‘Naatu Naatu’ ला मिळाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार

294

भारतीय मनोरंजन विश्वासाठी आनंदाची बातमी येत आहे. ऑस्कर अवॉर्ड 2023 ची घोषणा झाली असून यावेळी दक्षिण चित्रपट ‘आरआरआर’ RRR ने इतिहास रचला आहे. आजपर्यंत जे घडले नाही ते घडले आहे. भारताला दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. राजामौलींच्या (SS Rajamouli) आरआरआरने ऑस्करमध्ये इतिहास रचला असुन ‘नाटू नाटू’ला या सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी भारतातील तीन चित्रपटांनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आपला दावा मांडला. त्यापैकी दोन चित्रपटांनी ऑस्कर जिंकले आहेत. चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते.