मक्रणपुर परिषद : इथेच पहिल्यांदा घुमला क्रांतिकारी ” जयभीम ” चा नारा….

581

धम्मसेवक राजेंद्र तायडे (बौद्धाचार्य) : महाराष्ट्रातील संपूर्ण मराठवाडा शिवना नदिच्या अलिकडचा भाग (औरंगाबाद)कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशाचा स्वतंत्र मोठा भूभाग या संपूर्ण भारताच्या प्रदेशावर सातव्या निजामाचे राज्य होते. भारताचा हा भूभाग निजामाच्या अधिपत्याखाली असल्याने त्यास मोगलाई प्रदेश म्हणून ओळखला जात असे.या प्रदेशावर मोगल सम्राटाचि व त्याच्या सेनेची दहशत होती.

महार, मांग, चांभार, ढोर या जातितिल समाजावर ब्राम्हणांनी व सवर्ण हिंदूंनी ज्या प्रमाणे दलितांचे शोषण केले, अन्याय अत्याचार केला, गुलामा प्रमाणे वागविले त्याच प्रमाणे मुस्लिम समाजाने मोगलाइत गुलामा प्रमाणे वगविले जात असे.ब्राम्हण, जातीयवादी हिंदू व जातीयवादी मुसलमान ज्यांनी आम्हाला गुलामा प्रमाणे वागविले ते आमचे स्नेही कसे म्हणता येईल.

अशा कडव्या जातीयवादी सातव्या निजामाच्या राजदरबारी मोठ्या हुद्यावर B.S .More भाऊ साहेब मोरे नोकरी करित होते.निजामाचि नोकरी करता करता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी संबंध आला.दोघांची भेट झाली तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाऊ साहेब मोरेना म्हणाले आरे निजामाचि गुलामी करणे सोडून दे.बाबासाहेबांच्या शब्दाचा बाण भाऊसाहेब मोरे यांच्या छातीत छेद करून गेला, व लगेच निजामाचि मोठ्या हुद्याची नोकरी सोडून डॉ. बाबासाहेबांच्या प्रवाहात सामिल झाले.

भाऊसाहेब मोरेनि स्वतः परिश्रम घेवून निजामाच्या राजवटीत मराठवाड्यात मक्रणपूर (डांगर)ता.कन्नड जिल्हा -औरंगाबाद येथे 30डिसेंबर 1938रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य परिषद भरवली.या परिषदेस कन्नड पंचक्रोशितूण चार चार दिवस पायी प्रवास करून बाबासाहेबांना पाहण्यासाठी व त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आले होते.30डिसेंबर 1938रोजी मक्रणपूर (डांगर)परिषदेत निजामाच्या राजवटितच येवून भव्य दिव्य परिषदेत निजामालाच नाही तर जातीयवादी व धर्मप्रामाण्य वाद्याना धडा दिला.याच सभेत बाबासाहेबांची देशभक्ती संपूर्ण जगाला समजली. “मि प्रथम भारतीय आहे आणि शेवटि हि भारतीय राहिल.” अशी ऐतिहासिक घोषणा करून नविन अध्याय लिहिला गेला. निजामाच्या तोंडावर त्याच्याच राज्यात जावून निजाम मानवतेचा शत्रू असल्याची गर्जना करून आपण सर्व भारतीय आहोत व शेवटि हि भारतीय राहिले पाहिजे असे आपल्या समाजाला सांगणारे डॉ .बाबासाहेब आंबेडकर एकमेव खरे देशभक्त होते. निजामाच्या राजवटीत येवून बाबासाहेब म्हणतात,” हिंदू धर्मा प्रमाणे निजामहि आपला शत्रूच आहे. धर्मात सांगितलेल्या रूढी परंपरे प्रमाणे स्प्रुश्य लोक अस्प्रुश्य लोकांवर अन्याय करित आहेत.निजामाच्या राजवटीत यापेक्षा वेगळे काय घडले आहे. निजामाचे नेत्रुत्व झुगारुन द्या. निजाम हा पण मानवतेचा शत्रूच आहे.”निजामाला शत्रू म्हणण्याची कॉंग्रेस वाल्यांची हिंमत नव्हती.कारण महात्मा गांधी त्यावेळी आतून मुस्लिमांशी जवळीक साधून होते.
” निजामा विरोधी लढा द्या”
असे बाबासाहेब आंबेडकर जाहिर परिषदेत बोलत होते.
“भिम कि जय “चा नारा
30डिसेंबर 1938रोजी मक्रणपूर (डांगर )येथे भरलेल्या परिषदेत तमाम अस्प्रुश्य व मागासवर्गीय आले होते.या परिषदेत वक्ता म्हणून भाऊसाहेब मोरे यांनी प्रास्ताविक व बाबासाहेबांचे स्वागत केले.सुरुवातीस भाऊसाहेब मोरेनि निजामाच्या पापाचा पाढा वाचला, पुढे बोलताना भाऊसाहेब मोरेनि तमाम जनसमुदया समोर प्रश्न केला, बाबासाहेब आम्हाला रामराम म्हणता येत नाही आणि तुमच्या ती तत्वात बसत नाहि. नमस्कार व जोहारहि घालता येत नाहि, मग आम्ही म्हणायचे तरी काय ?
यावर बाबासाहेब मोठ्याने हसले, त्यांनी एकदाच भाऊसाहेबाकडे हास्य मुद्रेने बघितले.
बाबासाहेब तुम्ही आमच्या साठी देव आहात ! तुम्हीच आमच्या साठी सर्व काही आहात, तेव्हा तुमचा जयजयकार असो.आणि आजपासून आम्ही ” भिम कि जय” अशी घोषणा देत आहोत, या घोषणेला दुसरे संयोजक श्यामराव जाधव यांनी जोरदार समर्थन केले आणि यास अनुमोदन दिले व पुढे ” भिम कि जय” चे रूपांतर जयभिम मध्ये झाले.
या परिषदेचा एल्गार उमटत परिषदेचा इतिहास पण मोलाचा ठरला. हैदराबाद मुक्ती संग्रामची पार्श्वभूमी मक्रणपूर परिषदेत आढळते. 15ऑगस्ट 1947साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीशांचा वादहस्त लाभलेली संस्थाने मात्र स्वातंत्र्यापासून वेगळी होती. भारत देश राजकिय द्रुष्टया स्वतंत्र असला तरी घटनात्मक द्रुष्टया तो अलगाववादीच होता.भारताला राजकिय स्वातंत्र्याबरोबर त्याचे फेडरेशन होणे बाबासाहेबांच्या द्रुष्टीने महत्वाचे होते.त्याआधी बराचसा भाग फाळणी मुळे पाकिस्तानात गेला होता.संस्थाने तशीच राहिल्यास पुन्हा स्वतंत्र राष्ट्राची मागणी डोकं वर काढू शकते, हे बाबासाहेबांनी तंतोतंत हेरले होते.स्वतंत्र भारताचे पहिले ग्रुहमंत्री यांना बाबासाहेबांनी आदेश दिले “24तासाच्या आत निजामाच्या मुसक्या आवळा, कायद्याची बाजू मि सांभाळतो “कारण कायदा मंत्री स्वतः बाबासाहेब होते.अशी सांगून निजामाच्या ताब्यातील कर्नाटक, मराठवाडा, व तेलंगणा आंध्र प्रदेशाचा मोठा भूभाग स्वतंत्र भारताशी जोडला.या दरम्यान गोविंदभाई श्रॉफ हैद्राबाद मुक्ती लढ्यात सामिल झाले. मराठवाडा, कर्नाटक, व तेलंगणा त्या त्या राज्यांना जोडले गेले. याचे संपूर्ण श्रेय 30डिसेंबर 1938रोजी औरंगाबाद ता.कन्नड मक्रणपुर (डांगर) परिषदेला जाते.

धम्मसेवक : राजेंद्र तायडे (बौद्धाचार्य)