झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी SRA कार्यालयात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली बैठक.. 

सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे मिळवून देणार

279

मुंबई दि.11 – मुंबईतील विविध ठिकाणच्या प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात मार्गी लावावेत; कांदळवन आणि वन विभागाच्या जागेवरील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करावे आणि मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे मिळावीत यासाठी एस आर ए कार्यालयात सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बैठक घेतली. यावेळी एस आर ए चे सी ई ओ सतीश लोखंडे; डी एफ ओ रेड्डी; उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर ; तहसीलदार उमेश पाटील आदी अनेक अधिकारी उपस्थित होते.

कांदळवन जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन करणाऱ्या बिल्डर विकासकाला टी डी आर देण्यात यावा. त्यातून कांदळवन जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन करावे याबाबत एस आर ए मध्ये झालेल्या या बैठकीत रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना राबवून हक्काचे कायमस्वरूपी घर सफाईकामगारांना मिळावे यासाठीच्या सूचना रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

तसेच महापालिकेच्या सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती द्यावी;तसेच सफाईकामगारांना पदोन्नतीने क्लार्क पदी नियुक्ती साठी च्या जाचक अटी शिथिल कराव्यात याबाबत ही रामदास आठवले यांनी सूचना केल्या. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; झोपडपट्टी आघाडी चे अध्यक्ष सुमित वजाळे; मुंबई सरचिटणीस विवेक पवार; जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे; प्रकाश जाधव; घनश्याम चिरणकर; अलंकार जाधव; सचिन कासारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.