उरणकरांचे स्वप्न होणार लवकरच होणार पूर्ण; पार पडला लोकल रेल्वेचा ट्रायल रन…

153

नवी मुंबई : बहुप्रतीक्षित नेरुळ-बेलापूर-खारकोपर-उरण रेल्वे कॉरिडॉरवर लवकरच लोकल लवकरच सुरू होणार आहे. शुक्रवारी पहाटे खारकोपर ते उरण मार्गावरून लोकल रेल्वे धावली. हा लोकलचा ट्रायल रन होता, म्हणजेच अवघ्या काही दिवसांत या मार्गावर नियमित लोकल धावण्यास सुरुवात होणार आहे.

बेलापूर-उरण लोकल ट्रेन प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले होते, मात्र सिडकोकडून वेळेवर निधी न मिळणे, जमिनीचे हस्तांतरण आणि अन्य कारणांमुळे यास विलंब झाला. या प्रकल्पात सिडकोचा वाटा 67 टक्के आहे, तर रेल्वेचा वाटा 33 टक्के आहे. अनेक वर्षांपासून उरणकरांना लोकल ट्रेनची प्रतिक्षा होती, ही प्रतीक्षा आता संपली आहे.