इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडच्या सीसीअव्हेन्यू टॅपपेने कार्ड स्वाइपिंग मशिन्स बदलून स्मार्टफोन डिजिटल पेमेंट ऍप मध्ये केले रूपांतर 

216

मुंबई – इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडच्या सीसीअव्हेन्यूने कार्ड स्वाईपिंग मशीन बदलून स्मार्टफोन-आधारित टॅप पे या पेमेंट ऍपचा पर्याय आणला आहे. व्यापाऱ्यांना या ऍपचा दुप्पट फायदा झाला आहे. त्यांनी कार्ड स्वाइपिंग मशीनच्या खर्चावर बचत केली आहे सोबतच त्याच्या कार्यप्रवण खर्चातही बचत केली आहे. ऑक्टोबर 2022 पासून, 1.20 लाखांहून अधिक व्यापाऱ्यांनी टॅपपे ऍप डाऊनलोड केले आहे.

सीसीअव्हेन्यूजच्या या कामगिरीची दखल घेत इकॉनॉमिक टाईम्स बँकिंग फायनान्शिअल सर्व्हिस अँड इन्शुरन्स (ईटीबीएफएसआय) एक्सलन्स अवॉर्ड २०२२चा `बेस्ट पेमेंट सोल्युशन प्रोव्हायडर ऑफ दी इयर’ पुरस्कार सीसीअव्हेन्यूजच्या टॅपपेला प्रदान करण्यात आला. ईटीबीएफएसआय एक्सलन्स अवॉर्ड्स हा नाविन्यपूर्ण कल्पना आणि अनोख्या उपक्रमांना ओळखण्यासाठी आणि बँकिंग फायनान्शिअल सर्व्हिस अँड इन्शुरन्स क्षेत्रातील सेवा किंवा समाधान प्रदान करण्यात उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात येतो.

“कंपनीच्या वतीने, आमच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांना मान्यता दिल्याबद्दल मी ईटीबीएफएसआयचे आभार मानतो. सीसीअव्हेन्यूचे टॅपपे सोल्यूशन रोख व्यवहारांचे डिजिटायझेशन करण्यासाठी आणि लाखो व्यवसायांना शून्य हार्डवेअर खर्चासह सुरक्षितपणे पेमेंट स्वीकारण्यास सक्षम करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. प्रत्येक उद्योग आणि उद्योजक यांना कधीही, कुठेही सोप्या तंत्रज्ञानासह हा ऍप वापरता यावा हे आमचे ध्येय आहे.” असे प्रतिपादन इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी पंकज देढिया यांनी केले.