खान्देश कन्या’ पुरस्काराने नृत्यांगण गौतमी पाटीलचा गौरव…

260

Mumbai : आपल्या दिलखेचक अदांनी तरुणाईला भुरळ पडणारी लोकप्रिय व सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेली नृत्यांगण गौतमी पाटील चा खान्देश कन्या’ ह्या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते गौतमी पाटीलचा खान्देश कन्या हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

गौतमी पाटील वर अनेकदा टीका ही होत असते. तिच्या गौतमीच्या डान्सवरुन तिला ट्रोल देखील केलं जातं. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या हस्ते गौतमी पाटीलचा खान्देश कन्या (Khandesh Kanya) हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जयकुमार रावल यांनी गौतमीचे कौतुकही केले. या पुरस्काराने गौतमी देखील भारावून गेली असून तिने असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना… जय खान्देश !” असं म्हटलं आहे.