अग्रलेख | YuvaPrabhav.Com करतोय पाचव्या वर्षात पदार्पण…

229

( प्रफुल कांबळे) | नमस्कार मंडळी, आज खूप दिवसांनी तुमच्या समोर अग्रलेखाच्या माध्यमातून समोर येत आहे. त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छा, प्रतिसाद आणि भरभरून दिलेल्या प्रेमामुळे Yuvaprabhav.Com पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे आज माझ्यासाठी, माझ्या सर्व टीमसाठी हा आनंदाचा क्षण आहे. ३ डिसेंबर २०२२ रोजी Yuvaprabhav.Com चे अँड्रॉइड मोबाईल अँप देखील लाँच केले आहे. डिजिटल विश्वासात हे आमच्या साठी खूप मोठे पाऊल आहे. कोणतीही धनशक्ती सोबत नसताना, कोणताही राजकीय वरदहस्त नसताना, फक्त आणि फक्त सकारात्मक दृष्टिकोन, सातत्य आणि आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि सहभागाने युवाप्रभाव पुढे जात आहे. पाचव्या वर्षात पदार्पण करत असताना देखील ध्येय मोठेच आहे. आणि हे ध्येय सत्यात उतरवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा हि असणारच.

भीमा कोरेगाव लढाईतील ५०० वीर सैनिकांना मानाचा सलाम करून आपणा सर्वाना नव वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा आज या ठिकाणी देत आहे. युवाप्रभाव स्वतत्र आहे. प्रभावी आहे. आक्रमक आहे, मात्र तरीही युवाप्रभावला गरज आहे ती तुमच्या प्रतिसादाची, सहकार्याची आणि सहभागाची. युवाप्रभावाच्या फेसबुक पेज ला लाईक करा, twitter, Instagram वर फोल्लो करा, YouTube ला subscribe करा. आणि हा गुगल प्ले स्टोर ला जाऊन Yuvaprabhav चे अँप डाउनलोड करा. हेच खूप मोठे सहकार्य असेल आमच्यासाठी.

कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, “ज्या चळवळीला मुखपत्र नसते तिची अवस्था पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असते” ह्याच वाक्याने प्रभावित होऊन एक प्रभावी माध्यम निर्माण करायचेच असा निर्धार केला होता. सुरुवातीच्या काळात दर आठवड्याला हाताने लिहलेला म्हणजेच हस्तलिखित युवा प्रभाव सुरु केला होता. त्यानंतर साप्ताहिक, न्युज वेब पोर्टल, मोबाईल अँप असा आमचा प्रवास सुरु आहे. फक्त आता खऱ्या अर्थाने विशाल आणि भव्य दिव्य होणे बाकी आहे. युवा प्रभावमधील अग्रलेखाला मिळणारा प्रतिसाद हा अप्रतिम असतो. अग्रलेखच युवा प्रभावाची खरी ताकद आहे. प्रबोधन करणे, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे हे काम सातत्याने केले जाईल अशी ग्वाही पुन्हा एकदा या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

Email : kampraful@gmail.com

Mobile : 91-7208418997

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)