ठाणे जिल्ह्यात जादूटोणा प्रकार; पोलिसांनी केली आठ जणांना अटक…

283

Thane : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जादूटोणा आणि काळ्या जादूचे प्रकरण समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आठ जणांना सोमवारी अटक करण्यात आली. या प्रकरणातील एक जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. मुरबाड येथील टोकवडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतोष दराडे यांनी सांगितले की, रविवारी रात्री सोगाव येथे काही लोक काळी जादू व जादूटोणा करत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती.

या प्रकरणात दोन बनावट साधू आणि दोन महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे, तर रात्रीच्या वेळी एक व्यक्ती घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाली आहे.  पोलिसांनी 26 आणि 19 वयाच्या दोन महिलांची सुटका केली आहे, ज्या या विधीचा भाग बनणार होत्या. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी 2009 मध्ये इथे अशाच एका प्रकरणात एका बाबाना अटक करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.