स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ : प्राध्यापकांच्या निवड प्रक्रियेत आरक्षणाची पायमल्ली…

नसोसवायएफ चे विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे तक्रार.

293

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित अशासकीय महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापकाच्या निवड प्रक्रियेत बहुतांश महाविद्यालयाने सामाजिक आरक्षणाची (रोस्टर)अंमलबजावणी न करता निवड केल्याने अनेक मागास प्रवर्गातील पात्र उमेदवार सामाजिक आरक्षणापासून आणि नियुक्ती पासून वंचित राहिले आहेत.

राज्यातील ईतर विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या घड्याळी तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या निवडी संदर्भातील जाहिराती मध्ये आरक्षण लागू केले मात्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या

महाविद्यालयात सामाजिक आरक्षण नसल्याची गंभीर बाब असून याबाबत नसोसवाइफ या संघटनेने विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली असून सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयाची निवड प्रक्रिया रद्द करून नव्याने घ्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नसोसवायएफ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ हर्षवर्धन दवणे, राज्य प्रवक्ता सतीश वागरे यांनी दिला आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध अनुदानित अशासकीय महाविद्यालयात व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध संकुलात घड्याळी तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रियेत जाहिराती मध्ये सामाजिक आरक्षण आणि लागू करणे आवश्यक असताना बहुतांश महाविद्यालयाने अनुसूचित जाती ,अनुसूचितजमाती मागास प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या मुलाखती दिल्या परंतु बहुतांश संस्थेमध्ये मुलाखतीमध्ये मर्जीतील उमेदवारांना संधी देत व सामाजिक आरक्षण न पाळता निवडी केल्या आहेत.

त्यामुळे सामाजिक आरक्षण(रोस्टर) न पाळणाऱ्या घड्याळी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या रद्द करून त्या नव्याने मुलाखती घेण्यात याव्यात अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा नसोसवायएफ संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन दवणे राज्य प्रवक्ता सतीश वागरे,यांनी दिला आहे.