पनवेल मनपा आयुक्त सुधाकर शिंदेंची बदली; पुन्हा गणेश देशमुख यांची नियुक्ती…

362

पनवेल : महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पुन्हा एकदा गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सुधाकर देशमुख यांना परिस्थिती हाताळण्यासाठी पुन्हा पदभार देण्यात आला होता. परंतु आता गणेश देशमुख यांच्या हाती सुत्र सोपवण्यात आली आहेत. सुधाकर देशमुख यांना भिवंडी निजामपुर आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. सुधाकर देशमुख यांनी पनवेलमधील कोरोना परिस्थिती उत्तमरित्या हाताळली होती.

राज्याच्या नगरविकास विभागाकडून मंगळवारी (२९ जून) त्या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिकेचे नवे आयुक्त गणेश देशमुख यांना प्रशासकीय अनुभव आहे. तसेच त्यांनी पनवेल महानगरपालिकेचा उत्तम कारभारही केला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून उत्तम काम केलं आहे. मालमत्ता कराचा निर्णय झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेकडून त्यांना तीव्र विरोध करण्यात आला होता.