अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आर्थिक पाहणी अहवाल, 2022-23 मध्ये GDP वाढ 8-8.5% 5 टक्के अपेक्षित…

283

संसदेत 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. त्यापूर्वी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक पाहणी अहवाल हा संसदेमध्ये सादर केला.

अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक पाहणी अहवालात 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा तपशील देण्यात आला आहे. भारतीय अर्थव्यवस्था 2022-23 (एप्रिल 2022 ते मार्च 2023) या आर्थिक वर्षात 8-8.5 टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) अंदाजानुसार, आर्थिक विकास दर 9.2 टक्के असू शकतो.