Good News घर खरेदी करणाऱ्यांसाठी, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ कडून गृहकर्जावरील व्याजदरात घट…

876

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: जर तुम्हीही घर घेण्यासाठी गृह कर्ज (Home Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने गृहकर्जावरील व्याजदरात ( interest rates ) कपात केली आहे. बँकेचे नवे दर ( new rates ) 13 डिसेंबर 21 पासून लागू होतील.

बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जावरील व्याजदर कमी करीत ते 6.40 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली आहे. हा दर आतापर्यंतचा सर्वांत कमी दर आहे. सध्या बँक 6.80 टक्के व्याजाने गृहकर्ज देत आहे. बाजारातील स्पर्धा पाहता बँकेने कार कर्जावरील व्याजदर 7.05 टक्क्यांवरून 6.80 टक्क्यांवर आणले आहेत.