सत्तेतले हे बेलगाम घोडे, म्हणत चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल…

304

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पारनेरच्या लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला. घडलेल्या ह्या प्रकारावरून भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या सर्व प्रकारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली..आणि मन सुन्न झालं. सत्तेतले हे बेलगाम घोडे… देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतं का तेचं आता पहायचयं आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.