लिओनेल मेस्सीने अश्रू पुसलेल्या टिश्यूची किंमत तब्बल साडेसात कोटी?

404

lionel messi tissue | अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची गणना जगातील महान आणि श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. आताही त्याच्या अश्रूंचा प्रत्येक थेंब मौल्यवान झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. वास्तविक, ज्या टिश्यू पेपरने मेस्सीने अश्रू पुसले ते कोटींमध्ये पोहोचले आहे.

टिश्यू विक्रेत्याने असा दावा केला आहे की मेस्सीचे जेनेटिक देखील या टिश्यूमध्ये समाविष्ट आहे, ज्यामुळे लोकांना या महान फुटबॉल खेळाडूचे क्लोन करण्यास मदत होईल.

पीएसजी क्लबमध्ये सामील झाल्यावर तो माध्यमांशी बोलताना त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. या दरम्यान त्याची पार्टनर अँटोनेला त्याच्यासोबत होती आणि तिने मेस्सीला त्याचे अश्रू पुसण्यासाठी एक टिश्यू पेपर दिला. तो टिश्यू पेपर आता सुमारे 7.43 कोटी रुपयांना विकला जात आहे.

मेस्सीने फ्रेंच फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मन (PSG) सोबत तीन वर्षांचा करार केला आहे. आणि त्याच्याकडे हा करार वाढवण्याचा पर्यायही आहे. पॅरिस सेंट जर्मन लिओनेल मेस्सीला 35 दशलक्ष युरो म्हणजेच 305 कोटी रुपये प्रत्येक सिजनला देईल. पीएसजीने स्वतः मेस्सीसोबतच्या कराराबद्दल सांगितले होते. सध्या मेस्सी त्याच्या कुटुंबासह पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये राहात आहे.