बजरंगाची कमाल; भारताला मिळवून दिले ब्राँझ पदक…

317

ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि कझाकिस्तानच्या दाऊलेत नियाझबेकोव यांच्यात ब्राँझ पदकासाठी लढत झाली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत बजरंग पुनियाने कांस्य पदकावर नाव कोरले. सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंगने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली.