अफगाणिस्तानात महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होण्याची भीती- संयुक्त राष्ट्रसंघ.

338

वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्कालीन सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या परिषेदेचे महासचिव अॅन्टिनिओ गटेरर्स म्हणाले, की अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर नियंत्रण ठेवावे. विविध प्रातांमधून लोकांना स्थलांतरण करावे लागल्याने काबूलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे. सर्व पक्षांनी नियमांचे पालन करून नागरिकांच्या हितांचे संरक्षण करावे, अशी गटेर्रस यांनी विनंती केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याची भीती वाढत आहे. अफगाणिस्तान महिला आणि मुलींच्या हक्कांचे सरंक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व देशांनी अफगाणिस्तानी निर्वार्सितांना स्वीकारावे आणि त्यांना पाठवून देण्याचे टाळावे. तालिबान आणि सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय मानवता हक्क, अधिकार, सर्व नागरिकांच्या स्वातंत्र्यांचे संरक्षण करावे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी आवाहन केले.