पनवेल | ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

309

पनवेल : रूम खाली करण्यास दबाव टाकून  सोसायटीचे रहिवाश्यांसमोर शिवीगाळ करून अपमानित केल्याप्रकरणी दोघांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेदुटणे, वावंजे येथे राहणारे अमित तुकाराम अल्हाट यांना जयदीप ब्रह्मदेव बाबर (वय 34) आणि त्याचा मित्र याने रूम भाड्याने देऊन भाडेकरार केला नाही. तसेच त्यांना रूम खाली करण्यास दबाव टाकला. व सोसायटीत सार्वजनिक ठिकाणी सोसायटीतील रहिवाशांसमोर खाली करण्याकरता शिवीगाळ केली. व अपमान केला. म्हणून दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.