देशाला पाहिलं सुवर्ण पदक; मराठमोळ्या राहीने पटकावले गोल्ड मेडल.

330

मुंबई | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेअगोदर भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शुटिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या राही सरनोबतनेे (Rahi Sarnobat) गोल्ड मेडल पटकावलं आहे. मुळच्या कोल्हापूरच्या राहीने 5 मीटर पिस्तुलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत राहीने 39 गुणासह अव्वल स्थान मिळवलं आहे. राहीच्या ह्या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या आशा देशवासियांकडून वाढल्या आहेत.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन पदक मिळवली आहेत. भारताने याआधी एक रौप्य आणि कांस्य पदक जिंकले आहे.