घर विकत घेणाऱ्यांसाठी खूशखबर, ३० सप्टेंबरपर्यत मिळवा टॅक्समध्ये सूट…

316

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या संकटामुळे रिअल इस्टेट क्षेत्रावर (Real Estate) आणि उद्योग-धंद्यावर विपरित परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने घरात करण्यात आलेल्या गुंतवणुकीवरील (Home investment) करवजावटी साठीची (Tax benefit) मुदत वाढवली आहे.

घर विकत घेतल्यास मिळाणाऱ्या करसवलतीची मुदत (Deadline for Tax benefit)आता ३० जून २०२१ वरून वाढवून ३० सप्टेंबर २०२१ ही करण्यात आली आहे. १ एप्रिल किंवा त्यानंतर घर खरेदी करणारे नागरिक या कर सवलतीसाठी क्लेम करू शकतात. अर्थमंत्रालयाने (Ministry of Finance) ही माहिती जाहीर केली आहे. घर खरेदीतील करसवलतीची आधीची मुदत आता तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. (Tax benefit deadline for property buying or building is extended upto 30 september 2021)

रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सध्या गृहकर्जाचे व्याजदरदेखील खूपच कमी झालेले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्र हे देशातील महत्त्वाचे क्षेत्र असून यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. विशेषत: असंघटीत क्षेत्रात मोठा रोजगार रिअल इस्टेटमधून निर्माण होतो. आधीच मंदीत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला कोरोना महामारीमुळे आणखीच मोठा फटका बसला आहे.