‘आयसीसी’नं महेंद्रसिंग धोनीसाठी ट्विट केला खास व्हिडीओ…

304

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यांना फार धक्का बसला आहे. २०१४ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला होता. तर २०२० मध्ये वनडे आणि टी-20 मधून त्याने निवृत्ती घेतली. महेंद्र सिंग धोनीची भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून देखील ख्याती आहे. भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. आयसीसीने धोनीच्या निवृ्त्ती निमित्त खास व्हिडीयो तयार केला आहे.

आयसीसीने तयार केलेल्या या व्हिडीयोमध्ये धोनीच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. इंग्लंडचा क्रिकेटर जॉस बटलर याने या व्हिडीयोमध्ये धोनी मैदानावर कसा शांत डोक्याने खेळतो तसंच कशी परिस्थिती हाताळतो याबद्दल सांगितलंय. त्याचप्रमाणे भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही तणावपूर्ण परिस्थितीमध्ये धोनीच्या खेळाच्या शैलीचं कौतुक केलं आहे. शिवाय भारताचा गोलंदाज जसप्रित बुमराह अफगाणिस्तानचा विकेट-कीपर मोहम्मद शहजाद, इंग्लंडचा क्रिकेटर बेन स्टोक्स यांनीही धोनीविषयीचं आपलं मत मांडलं आहे.