….तर माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी – ऍड. प्रकाश आंबेडकर

397

अकोला – राज्यात यापुढे लॉकडाऊन मध्ये वाढ करू नका, नागरिक कोरोना ऐवजी बेरोजगारी व उपासमारीने मरतील. असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन मुदतवाढीला जोरदार विरोध केला आहे. अकोला येथील सर्किट हाऊस मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकारने ३१ जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आता आम्हाला फक्त लॉकडाऊन मोडावा लागेल. दानदात्यांची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने लोकांना मदत करावी. ३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाऊन वाढवू नये. अन्यथा रस्त्यावर उतरुन विरोध करु. सरकार गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवत आहे. मात्र ती भीती आम्हाला दाखवायची नाही. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.