मोदी सरकारचा ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप…

670

नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या आरक्षण नितीमुळे सन २०१७ पासून इतर मागासवर्गाचे ११ हजार विद्याार्थी वैद्याकीय प्रवेशापासून वंचित राहिले. केंद्र सरकारने नीटला हाताशी धरत ‘कट ऑफ’ मध्ये बदल घडवून ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

केंद्र सरकारने ओबीसींसाठी राखीव असलेल्या वैद्याकीय जागेवर या प्रवर्गातील विद्यााथ्र्यांना प्रवेश दिला नाही. केंद्र सरकारच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे २०१७ पासून ते आजपर्यंत ११ हजार विद्यााथ्र्यांना फटका बसला. देश पातळीवरील ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऑधर बॅकवर्ड क्लासेस’नी ही आकडेवारी जाहीर केली. ‘नीट’द्वारे प्रवेशामध्ये ओबीसींचे २७ टक्के आरक्षण दिले नाही. भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, नीटमार्फत होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींचे आवश्यक आरक्षण २०१७ पासून कमी केले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वसामान्य विद्याार्थी वंचित राहिले आहेत, असे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

शासनाने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा करोनाला न मानता वंचित आघाडीच्या झेंड्याखाली ओबीसी विद्याार्थी तीव्र आंदोलन छेडणार आहेत, असे ते म्हणाले. यावेळी प्रदेश प्रवक्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

लेख,बातम्या, प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी yuvaprabhav@gmail.com वर मेल कराव्यात.
योग्य व उत्कृष्ट लिखाणास YuvaPrabhav.com ह्या वेब पोर्टल वर प्रसिद्ध केल्या जातील… (संपादक)