#निसर्ग_वादळ : रायगड साठी मुख्यमंत्री ठाकरे यांची १०० कोटींची मदत जाहीर…

482

#निसर्ग_वादळ : रायगड साठी मुख्यमंत्री ठाकरे यांची १०० कोटींची मदत जाहीर…

निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे. वादळाचा फटका बसलेल्या इतर भागाचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करु असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे रायगडमधील नुकसानाची पाहणी कऱण्यासाठी पोहोचले आहेत. पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं की, “आपण पॅकेज जाहीर करणार नसून सध्या १०० कोटींची मदत जाहीर करत आहोत. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानीकडे पाहत असताना पंचनामे कऱण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने आदेशाची वाट न पाहता कामाला सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर पुढील मदत जाहीर करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. केंद्राकडे मदत मागण्यासंबंधी विचारलं असता उद्धव ठाकरेंनी नुकसान झाल्यानंतर लगेच मागावं असं होऊ नये. आपण व्यवस्थित आढावा घेऊन मदत मागू असं त्यांनी सांगितलं आहे.

लेख,बातम्या, प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी yuvaprabhav@gmail.com वर मेल कराव्यात.
योग्य व उत्कृष्ट लिखाणास आपल्या वेब पोर्टल वर प्रसिद्ध केल्या जातील… (संपादक)