रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी ठाणे येथे दाखल…

484

ठाणे || करोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी ठाण्यात दाखल झाली आहे. रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी आज ठाणे शहरात दाखल झाली आहे. १२० जवानांची एक तुकडी ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, श्रीनगर, कळवा, मुंब्रा आणि डायघर परिसरात ही तुकडी तैनात असणार आहे.

केंद्रीय पोलीस दलाच्या एकूण १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. ज्यामध्ये रॅपिड अॅक्शन फोर्सच्या ५ तुकड्या , CISF च्या ३ तुकड्या आणि CRPF च्या २ तुकड्यांचा समावेश आहे. या तुकड्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे तैनात करण्यात येणार आहे.

Order now On #AMAZON: #SAMSUNG GALAXY M31 #Megamonster Starting: Rs. 15999/-