“जीना है? और कर्जा लो” मोदी सरकारच्या आत्मनिर्भर पॅकेजवर काँग्रेसची खोचक टिका…

459

मुंबई || करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात केली आहे. ह्याच अभियानाअंतर्गत त्यांनी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेन्द्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधील तरतूदी विस्तृतपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवर काँग्रसेनं खोचक टीका केली असून, आत्मनिर्भरतेचा अर्थ सांगत मोदी सरकारला टोला देखील लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील योजनांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केली. त्यात स्थलांतरित मजुरांसह विविध घटकांवर लक्ष देण्यात आले. निर्मला सीतारामन यांनी नऊ योजनांची माहिती दिली.

मागील काही दिवसांमध्ये स्थलांतरित मजुरांचे आणि त्यांच्या कुटुंबीय त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी हजारो मैलाची रस्त्यांवरून पायपीट करत आहेत. या मजुरांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचे सीतारामन सांगितलं.

सीतारामन यांनी दोन पत्रकार परिषदांमध्ये केलेल्या घोषणांवर काँग्रेसनं टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करून सरकारवर टीका केली आहे. “निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचं सार, जगायचं असेल, तर आणखी कर्ज घ्या. आत्मनिर्भरतेचा अर्थ समजला का?,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.