छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही…

658

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकावरून भाजपाला मोठ्याप्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. सर्वच थरातून भाजपवर टीकेचा भडीमार होता आहे. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच, भाजपा पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील. असा देखील इशारा त्यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे, संजय राऊत, राजीव सातव, जितेंद्र आव्हाड यांनी देखील या मुद्यावरून भाजपावर जोरादार टीका केली आहे. शिवाय, या पुस्तकावर तात्काळ बंदी आणून भाजापाने माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन करण्यात आले. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या पुस्तकाचे वृत्त सोशल माध्यमातून पसरल्यानंतर भाजपावर सगळीकडून टीका केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.